खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी केले अवध्या एका तासात अटक
 
                                    
                                शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांना माहिती मिळाली की गळ्याला मार लागलेला एक इसम रक्तबंबाळ होऊन बागला चोक परीसरात बेहोश पडला आहे . अशी माहिती मिळाल्याने लगेच सदर ठिकाणी पोहचुन रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलिस वाहनात जखमीस उपचाराकरीता सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल केले. तेव्हा उपचारादरम्याण जखमीने सांगितले की त्याला आकाश उर्फ चिरा नावाचे इसमाने पैशाच्या वादावरूण गळ्यावर सर्जीकल ब्लेड ने मारले आहे असे सांगितले.या वरुन पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर चे गुन्हे शोध पथक चे प्रमुख सपोनी निलेश वाघमारे व पथक तात्काळ रवाना होवुन मारेकरी इसम नामे आकाश उर्फ चिरा यांचा शोध सुरू केला असता सदर मारेकरी इसम हा गौतम नगर येथे एका झोपडीत लपुन असल्याची माहीती मिळाली तेव्हा सपोनी निलेश वाघमारे व पथक तात्काळ सदर ठीकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेतले.
जखमी इसम नामे संदीप मनोर चौधरी (२८) रा. महावीर नगर चंद्रपुर याचे मामा नामे मनोज रामाजी फुलझेले यांचे तकरी वरूण पोस्टे अप क ९३१/२४ कलम १०९ भारतीय न्याय संहीता (३०७ भादवी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी नाव अजय उर्फ चिराअरवींद देशभ्रतार (३०) रा. दुर्गापुर चंद्रपुर यास सदर गुन्हयात अटक करूण आरोपीकडुन एक सर्जीकल ब्लेड जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके सा. यांचे नेतृत्वत खाली स.पो.नी. निलेश वाघमारे, पोउपनी. संदीप बच्छीरे, सफौ. महेंद्र बेसरकर , पोहवा सचीन बोरकर, संतोष कनकम, मपोहवा भावना रामटेके, नापोका कपुरचंद, पोका ईम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे , ईर्शाद खान, रूपेश रणदिवे , शाहबाज अली,खुशाल कवले, विक्रम मेश्राम यांनी केली आहे. सदर गुन्हयाचे पुढील तपास पोउपनी महेश इटकल पोस्टे चंद्रपुर शहर हे करीत आहे.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            